पावसामुळे भिंतींवर आलेली बुरशी पुसण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना !

‘पावसाळ्यात आश्रमातील खोल्या, सेवा करण्याचे कक्ष, आश्रम परिसर, सामूहिक प्रसाधनगृहे, मार्गिका, जिने, साधकांसाठी असलेली निवासस्थाने इत्यादी ठिकाणच्या भिंतींवर मोठ्या प्रमाणात बुरशी येण्यास आरंभ होतो. त्यामुळे आश्रमसेवकांनी आश्रमातील खोल्या, सेवा करण्याचे कक्ष, आश्रम परिसर, तसेच साधकांसाठी असलेली निवासस्थाने येथील भिंतींवरील बुरशी पुसण्याचे पहिल्या टप्प्यातील नियोजन २.८.२०२१ ते १४.८.२०२१ या कालावधीत पूर्ण करावे. त्यानंतर दुसर्‍या टप्प्यातील बुरशी पुसण्याचे नियोजन १.१०.२०२१ ते १४.१०.२०२१ या कालावधीत पूर्ण करावे.

प्रतिकात्मक छायाचित्र

बुरशी पुसतांना पुढील काळजी घ्या !

१. बुरशी पुसण्यासाठी रंग न जाणारे अथवा पांढरे कापड वापरावे. ते सुती (कॉटनचे) आणि स्वच्छ असावे.

२. ‘ऑईल पेंट’ने रंगवलेल्या भिंतीवरील बुरशी काढतांना द्रव साबणाच्या (‘लिक्विड सोप’च्या) पाण्यात सुती कापड ओले करून ते पिळून घेऊन त्याने बुरशी पुसावी. नंतर स्वच्छ कोरड्या कापडाने भिंत पुसावी.

३. साध्या रंगाने रंगवलेली भिंत पुसतांना प्रथम केवळ स्वच्छ कोरड्या कापडाने पुसावी आणि तरीही बुरशीचे डाग न गेल्यास कापड साध्या पाण्यात ओले करून ते घट्ट पिळून घेऊन त्याने हलक्या हाताने अलगदपणे बुरशी पुसावी.

४. ओल आलेल्या भिंतींवर बुरशी आली असल्यास ती स्वच्छ कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसावी.

५. बुरशी पुसतांना ‘भिंतीचा रंग खराब होणार नाही’, याची काळजी घ्यावी.

६. बुरशी पुसतांना कापड खराब होत असेल, तर कापडाची बाजू पालटावी. पूर्ण कापड खराब झाल्यास कापड पालटावे. खराब कापडाने भिंती पुसल्यास बुरशी पूर्णपणे निघत नाही, तसेच रंगही खराब होऊ शकतो.

७. ‘एखाद्या ठिकाणचे बुरशीचे डाग काढणे पुष्कळ कठीण आहे’, असे लक्षात आल्यास त्याविषयी बांधकामाच्या संदर्भातील सेवा करणारे साधक श्री. जगदीश पाटील यांना ९१५२६००८१७ या भ्रमणभाष क्रमांकावर संपर्क करावा.’

– श्री. गौतम गडेकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(३१.७.२०२१)