कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

साधकांसाठी सूचना, तसेच वाचक आणि हितचिंतक यांना नम्र विनंती !

प्रातिनिधिक छायाचित्र

सध्या कोरोना महामारीच्या कालावधीत जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जात आहेत, त्यांना अनेक कटू अनुभवही येत आहेत, उदा. तपासणीसाठी नमुने घेतांना ते योग्य प्रमाणात न घेतल्याने रुग्णांना पुन्हा नमुने देण्यासाठी धावपळ करावी लागणे, तपासणी अहवाल वेळेत न देणे, तपासणी अहवालाचा सविस्तर तपशील न देणे, रुग्णालयात व्हेंटिलेटर उपलब्ध नसल्याचे सांगणे; मात्र प्रतिष्ठित व्यक्तीने दूरभाष केल्यावर रुग्णाला भरती करून घेऊन व्हेंटिलेटरवर ठेवणे, शासकीय रुग्णालयांत विनामूल्य मिळणारे इंजेक्शन उपलब्ध नसणे, त्यामुळे बाहेरून सहस्रो रुपयांचे इंजेक्शन विकत आणायला लावणे, रुग्णालयात मौल्यवान वस्तूंची, तसेच पैशाची चोरी होणे इत्यादी.

आपणासही अशा प्रकारचे कटू अनुभव आले असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा. समाजाच्या प्रबोधनासाठी असे अनुभव त्वरित लिखित स्वरूपात कळवणे, ही काळानुसार समष्टी साधना आहे, हे लक्षात घेऊन येणारे कटू किंवा चांगले अनुभव त्वरित पाठवावेत.

आरोग्य साहाय्य समिती

पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, आरोग्य साहाय्य समिती, ‘मधु स्मृती’, सत्यनारायण मंदिराच्या शेजारी, फोंडा, गोवा. ४०३ ४०१.  संपर्क क्रमांक : ७०५८८८५६१०

ई-मेल पत्ता : [email protected]