घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

श्री. बबन वाळुंज

‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’ – श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.

अ. ‘छाती आणि पाठ यांत वेदना होऊ लागल्यावर जवळच्या रुग्णालयात जाणे, ‘इ.सी.जी.’ काढल्यावर तो सामान्य न आल्याने तेथील आधुनिक वैद्य अन् परिचारिका यांनी हाताला धरून ओढत बाहेर आणणे आणि हृदयावर उपचार करणार्‍या रुग्णालयात नेण्यास सांगणे : ‘७.११.२०२० या दिवशी मला माझी छाती आणि पाठ यांत वेदना होऊ लागल्या. तेव्हा ‘रुग्णालयात भरती व्हावे लागेल’, याची मला जाणीव झाली. माझी पत्नी सौ. निर्मला मला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेली. त्या वेळी माझी कोरोनाची चाचणी करावी लागणार होती. मला ‘जवळच असलेल्या ‘लॅब’मध्ये रक्त तपासणी करून घ्या’, असे सांगितले. माझी रक्ताची तपासणी केल्यावर आधुनिक वैद्यांनी मला रुग्णालयात भरती करून घेतले. माझा ‘इ.सी.जी.’ काढल्यावर तो सामान्य न आल्याने तेथील आधुनिक वैद्य आणि परिचारिका यांनी माझ्या हाताला धरून मला ओढत बाहेर आणले. त्यांनी माझ्या पत्नीला ‘यांना लवकरात लवकर हृदयावर उपचार करणार्‍या रुग्णालयात घेऊन जा. आम्ही तेथे दूरभाष केला आहे’, असे सांगितले.

– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.

या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/498023.html