उच्च लोकांतून पृथ्वीवर जन्माला आलेले दैवी बालक, तसेच युवा साधक यांच्या पालकांना सूचना !

रामनाथी आश्रमातील संकलन विभागात अनेक जिल्ह्यांतील पालकांकडून स्वतःच्या पाल्याविषयीचे लिखाण प्रसिद्धीसाठी येते. अनेकदा सूचना देऊनही या लिखाणात बरीच माहिती अपूर्ण असते, उदा. बालकाचे पूर्ण नाव नसणे, वय नसणे, गावाचे आणि जिल्ह्याचे नाव नसणे आदी त्रुटी असतात. त्यामुळे ही माहिती गोळा करण्यात संबंधित साधकांना बराच वेळ द्यावा लागतो. यासाठी पालकांनी कृपया पुढील सूत्रांनुसार संकलन विभागात माहिती पाठवावी.

१. माहिती पाठवण्याचा तपशील

अ. बालक किंवा बालिकेचे संपूर्ण नाव, गाव, जिल्हा आणि राज्य

आ. जन्मदिनांक, जन्मतिथी, अचूक जन्मवेळ, जन्मस्थान (गाव, तालुका आणि जिल्हा)

इ. लिखाण देणार्‍या पालकांचे नाव, पाल्याशी असणारे त्यांचे नाते, लिखाणाचा दिनांक आणि पालकांचा भ्रमणभाष क्रमांक लिहिलेला असावा.

ई. लिखाण पाठवतांना पूर्वी आध्यात्मिक पातळी काढली असल्यास पालकांनी ती आणि तिचे वर्ष धारिकेत नमूद करावे.

२. दैवी बालकांच्या लिखाणात कोणती सूत्रे असणे अपेक्षित आहे ?

अ. गुणवैशिष्ट्ये देतांना पालकांनी पाल्याच्या त्या त्या वेळच्या वयाचा, उदा. वय १ ते ६ मास, ६ मास ते १ वर्ष अशा प्रकारे उल्लेख अवश्य करावा.

आ. बालकाच्या गुणवैशिष्ट्यांविषयी (पूर्वी लिहून दिली असल्यास त्या वैशिष्ट्यांत काही पालट जाणवत आहेत का ? आणि नवीन गुणवैशिष्ट्ये यांविषयी) नेमकेपणाने लिहावे.

इ. बालसाधक सध्या व्यष्टी साधना म्हणून काय करतो ? तसेच नियमित कोणती सेवा करतो ?

ई. बालकांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

उ. धर्माचरण करणे किंवा विडंबन थांबवणे यांविषयीच्या त्याने केलेल्या काही कृती

ऊ. बालकांतील श्रद्धा, भाव आदी दर्शवणारे प्रसंग

ए. संतांनी बालकाविषयी काही उद्गार काढले असल्यास किंवा कौतुक केले असल्यास त्याविषयी थोडक्यात लिखाण

ऐ. त्याच्याविषयी जाणवलेली अन्य महत्त्वपूर्ण सूत्रे

ओ. बालकात जाणवणारे स्वभावदोष आणि त्यासाठी तो करत असलेले प्रयत्न

बरेच पालक प्रत्येक वर्षी वाढदिवसाला बालकाचे लिखाण पाठवतात. असे लिखाण पुष्कळ येत असल्याने दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे लिखाण प्रसिद्ध करण्यास जागा अपुरी पडते. त्यामुळे प्रत्येक वर्षी असे लिखाण पाठवू नये. वैशिष्ट्यपूर्ण लिखाण असल्यास ३ – ४ वर्षांनी पाठवावे. ज्या पालकांनी अजूनपर्यंत एकदाही आपल्या पाल्याची गुणवैशिष्ट्ये संकलन विभागात पाठवली नसतील, त्यांनीही वरील सूत्रांप्रमाणे अभ्यास करून बालकांचे अवास्तव लिखाण न पाठवता वैशिष्ट्यपूर्ण लिखाण पाठवावे. पाल्याच्या वाढदिवसाला गुणवैशिष्ट्ये प्रसिद्ध करायची असल्यास पालकांनी ती न्यूनतम ३ आठवडे अगोदर ग्रंथ विभागात पाठवावीत.

३. महत्त्वाची सूचना

सोबत बालकांची २ – ३ प्रकारची, दृष्टी समोर असलेली आणि हसरा अन् जबड्याचा खालचा भाग न दिसेल, असा तोंडवळा असलेली अन् सध्या काढलेली सात्त्विक छायाचित्रे पाठवावीत. ती शाळेच्या गणवेशात किंवा अन्य वेशभूषेत न काढता सात्त्विक पोशाखात काढावीत. त्याची पार्श्वभूमी साधी असावी. बालकांच्या छायाचित्रासमवेत लिखाण देणारे पालक आणि नातेवाईक यांनीही त्यांची सात्त्विक छायाचित्रे पाठवावीत.

४. माहिती पाठवण्याचा संगणकीय पत्ता

पालकांनी त्यांच्या पाल्याची छायाचित्रे आणि सर्व माहिती रामनाथी आश्रमात [email protected] या संगणकीय पत्त्यावर पाठवावी. पालकांना शक्य नसल्यास ही माहिती जिल्ह्यांतील साधकांनी / जिल्हासेवकांनी पाठवावी.

पोस्टाचा पत्ता : सनातन आश्रम, २४ / बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. ४०३४०१

– ग्रंथ विभाग, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२.७.२०२१)