अमृत महोत्सवानिमित्त गोव्यातील कवळे आणि कपिलेश्वारी येथील सनातनच्या हितचिंतकांनी मार्गावर काढल्या रांगोळ्या !

परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवानिमित्त त्यांच्या प्रती भाव प्रकट करण्यासाठी कवळे आणि कपिलेश्वमरी भागातील नागरिक आणि सनातनचे साधक यांनी मार्गावर सुरेख रांगोळ्या काढल्या. कपिलेश्वणरी येथील सौ. दीप्ती नाईक, सौ. सर्वदा नाईक, तसेच कवळे येथील सौ. शुभदा कवळेकर, सौ. अश्विननी आमोणकर, कु. गौरी नाईक, सौ. उषा नाईक यांनी १७ आणि १८ मे या दिवशी मार्गावर सुरेख रांगोळ्या काढल्या होत्या. काही ठिकाणी डांबरी मार्ग गोमयाने सारवून त्यावर रांगोळी काढण्यात आली. कवळे येथील श्री. दामू कवळेकर यांनी श्री शांतादुर्गा मंदिर ते सनातनचा रामनाथी आश्रम या मार्गोवर भगवे ध्वज लावले आहेत.

परात्पर गुरु डॉक्टर आठवले यांचा वाढदिवस साजरा करण्यासंदर्भातील दृष्टीकोन

‘२००४ – २००५ या वर्षी सुखसागर, फोंडा येथील सेवाकेंद्रात असतांना साधकांनी प.पू. डॉक्टरांना त्यांचा वाढदिवस साजरा करण्याविषयी विचारले. त्या वेळी ते साधकांना उद्देशून म्हणाले, ‘‘मी तर अनादी अनंत आहे. ज्याला जन्मही नाही आणि मृत्यूही नाही, त्याचा कसला वाढदिवस साजरा करता ?’’
– एक साधक
(परात्पर गुरु डॉक्टरांचा असा दृष्टीकोन असूनही त्यांनी महर्षींच्या आज्ञेचे पालन म्हणजेच ईश्वरेच्छा म्हणून त्यांचा अमृत सोहळा केवळ साधकांना आनंद देण्यासाठी साजरा केला. – संपादक)