मालेगाव निवडणुकीमध्ये भाजपकडून ४५ मुसलमानांना उमेदवारी

मालेगाव – मालेगाव महापालिकेतील ८४ जागांपैकी ७७ जागांसाठी भाजपने उमेद्वार घोषित केले आहेत. विशेष म्हणजे यांमधील ४५ उमेद्वार मुसलमान आहेत. एकाच निवडणुकीत इतक्या मोठ्या प्रमाणात मुसलमान उमेद्वारांना संधी देण्याची भाजपची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी देशभरात भाजपने कधीही एवढ्या मोठ्या प्रमाणात मुसलमानांना उमेदवारी दिलेली नाही. एम्आयएम् पहिल्यांदाच मालेगाव महापालिकेची निवडणूक लढवणार आहे, तर शिवसेनेने २५ जागांवर उमेदवार दिले आहेत.