बेपत्ता पाकिस्तानी नागरिक माहिती नाही ! – आतंकवादविरोधी पथक

मुंबई – पाकिस्तानी नागरिक बेपत्ता असल्याविषयी अधिकृतपणे कोणतीही माहिती आली नाही; मात्र सुरक्षेच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेण्यात येईल, असे राज्याच्या आतंकवाद विरोधी पथकाने म्हटले आहे. (निरपराध हिंदुत्वनिष्ठांच्या चौकशीमध्ये कित्येक घंटे वाया घालवणार्‍या आतंकवादविरोधी पथकाने आतंकवाद पसरवणार्‍या पाकमधील तसेच देशातील धर्मांधांवर लक्ष ठेवल्यास राज्यातील जनता सुरक्षितता अनुभवू शकेल ! – संपादक) परिसरात संशयास्पद व्यक्ती, वस्तू निदर्शनास आल्यास त्याविषयी तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन आतंकवाद विरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांनी केले आहे. जुहू परिसरातून २६ पाकिस्तानी नागरिक काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचे वृत्त प्रकाशित झाले होते.