वाराणसी येथे श्री काशी विश्‍वनाथ मंदिरातील शिवलिंगाला पुरोहितांकडून उत्स्फूर्तपणे विशेष अभिषेक !

वाराणसी (उत्तरप्रदेश) – परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने वाराणसी येथील श्री काशी विश्‍वनाथ मंदिरातील शिवलिंगाला पुरोहित श्री. कन्हैय्याजी यांनी १८ मेच्या पहाटे ५ वाजता उत्स्फूर्तपणे विशेष अभिषेक केला. या वेळी सनातनचे ६७ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले साधक श्री. नीलेश सिंगबाळ हे श्रीगुरूंचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते. अभिषेक झाल्यानंतर श्री. सिंगबाळ यांना अभिषेकाचा प्रसाद म्हणून भस्म, रुद्राक्ष माळा आणि श्री काशी विश्‍वनाथाला परिधान केलेले वस्त्र देण्यात आले.

श्री. कन्हैय्याजी यांना १७ मे या दिवशी सद्गुरु (सौ.) अंजलीमाताजी (अंजली गाडगीळ) यांची आठवण येत असल्याकारणाने भ्रमणभाष केला. त्यावर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाविषयी सांगितले. हे संभाषण झाल्यानंतर सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितले की, पुरोहित श्री. कन्हैय्याजी यांना आठवण येऊन त्यांनी भ्रमणभाष करणे म्हणजे, श्री काशी विश्‍वनाथ यांनी आठवण काढल्यासारखे आहे.