इंटरनेट सेवा अधिक वेगवान करण्यासाठी इस्रो ३ उपग्रह सोडणार

नवी देहली – इस्रोकडून पुढील १८ महिन्यांत जीसॅट-१९, जीसॅट-११ आणि जीसॅट-२० या ३ उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे. या उपग्रहांचा वापर स्मार्ट सिटी प्रकल्पांमधील संपर्क यंत्रणेसाठी केला जाणार आहे. जीसॅट-१९ उपग्रहामुळे देशातील दूरसंचार व्यवस्था अधिक वेगवान होईल, अशी माहिती कर्णावतीमधील स्पेस अ‍ॅप्लिकेशन्स सेंटरचे तपन मिश्रा यांनी दिली. येत्या काळात इंटरनेटच्या माध्यमातून वायरलेस तंत्रज्ञानाने टीव्ही पाहू शकता येणार आहे. दूरसंचार क्षेत्रासाठी उपग्रहांचे प्रक्षेपण केले जात असल्याने इंटरनेट सेवा वेगवान आणि स्वस्त होणार आहे. जीसॅटमुळे इंटरनेटचा सध्याचा वेग १ गिगाबाईट प्रति सेकंद इतका आहे. जीसॅट-१९ मुळे हा वेग ४ गिगाबाईट प्रति सेकंद इतका होईल. म्हणजे जीसॅट-१९ या उपग्रहाची क्षमता सध्याच्या उपग्रहाच्या तुलनेत चारपटीने अधिक असेल.