जय गुरुदेव ! कृतज्ञ गुरुदेव !

आजि सोनियाचा दिनु । वर्षे अमृताचा घनु ही उक्ती आज आम्ही अगदी तंतोतंत अनुभवत आहोत. राष्ट्रगुरु, ज्ञानगुरु, मोक्षगुरु, विश्‍वगुरु, जगद्गुरु अशा कितीही पदव्या थिट्याच वाटणारे आमचे परमपूज्य हे खरेतर कल्पतरुच आहेत. त्यांच्या सर्वांगीण अन् व्यापक कार्याचे गुणगान आम्ही काय करावे ? आज महर्षींच्या आज्ञेने परात्पर गुरु डॉक्टरांचा अमृत महोत्सव सोहळा साजरा होत आहे. त्या निमित्ताने त्यांच्या अलौकिक जीवनातील काही पैलूंचा अमृतकुंभ वाचकांसमोर रिता करतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अलौकीक व्यक्तीमत्त्वाचे विविध पैलू उलगडण्यासाठी आम्ही या अमृत महोत्सवी वर्षात विविध विशेषांक प्रसिद्ध केले. तसेच नियमित सदराच्या माध्यमातूनही परात्पर गुरु डॉक्टरांच्या कार्याची वाचकांना ओळख करून देण्यात आली. विश्‍वकल्याणार्थ अहोरात्र झटणारे, साधकांची माऊली होऊन त्यांना अध्यात्मात पुढे पुढे घेऊन जाणारे साक्षात् श्रीविष्णूचा अवतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी अनन्य भावे कोटी कोटी कृतज्ञता ! – सनातन प्रभात समूह