साधकांनो, परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सवाच्या दिवशी भावपूर्ण कृती करा !

साधकांना सूचना

१६.५.२०१७ या दिवशी दैनिक सनातन प्रभातमध्ये ‘परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या अमृत महोत्सव सोहळ्याच्या दिवशी साधकांनी परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांचे अधिकाधिक स्मरण करावे आणि आपापल्या घरामध्ये परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांच्या छायाचित्रासमोर पुष्पार्चना करावी (पुष्प अर्पण करावे) !’ या मथळ्याखाली चौकट प्रसिद्ध झाली आहे. या चौकटीविषयी साधकांनी ‘परात्पर गुरु यांची प्रतिमा नसेल, तर काय करावे ?’ आणि ‘प्रतिमेस किती संख्येने पुष्पे अर्पण करावीत ?’, अशी विचारणा केली आहे. त्याची उत्तरे पुढीलप्रमाणे आहेत.

१. परात्पर गुरु श्री श्री जयंत बाळाजी आठवले यांची प्रतिमा नसल्यास मानसरित्या तसा भाव ठेवून तुपाचा दिवा प्रज्वलीत करावा.
२. पुष्पांच्या उपलब्धतेनुसार ती अर्पण करावीत अथवा मानसरित्या पुष्प अर्पण करावे.
– (सद्गुरु) सौ. बिंदा सिंगबाळ