वर्ष २०१९ मध्ये देहली येथे झालेल्या गुरुपौर्णिमेच्या वेळी देहली येथील साधकांना आलेल्या अनुभूती

१. कु. टुपुर भट्टाचार्जी

१ अ. प्रवचनाचा विषय लक्षात न रहाणे आणि सराव करतांना श्रीकृष्ण अन् अर्जुन यांना प्रार्थना करणे : ‘गुरुपौर्णिमेच्या दिवशी माझ्याकडे प्रवचनाची सेवा होती; पण विषय माझ्या लक्षात रहात नव्हता. प्रवचनाचा सराव करतांना मी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांना प्रार्थना केली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी व्यासपिठावर जातांना माझा घसा आवळला जात होता. नंतर मी गुरुकृपेने आपोआप ठीक झाले. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना ‘मी कुठल्यातरी दुसर्‍याच लोकात आहे’, असे मला जाणवत होते.

१ आ. प्रवचनाच्या सुधारित संहितेतील क्रमात पालट असल्यामुळे सूत्रे सांगतांना ती वर-खाली होणे आणि त्या वेळी गुरुदेवांनी आतून मार्गदर्शन करणे : प्रवचन करतांना माझ्या हातात प्रवचनाची सुधारित छापील संहिता होती आणि त्यातील सूत्रांच्या क्रमात पालट झाला होता. त्यामुळे माझ्याकडून तिसर्‍या क्रमांकचे सूत्र आधीच सांगितले. तेव्हा आतून आवाज आला, ‘काही हरकत नाही. आता यानंतर सूत्र क्रमांक १ आणि २ सांग.’ मला हातवारे करून बोलण्याची सवय आहे. एकदा आतून आवाज आला, ‘हातवारे करू नकोस.’ अशा प्रकारे परात्पर गुरु डॉक्टरांचे आतून मार्गदर्शन ऐकून मला पुष्कळ कृतज्ञता वाटत होती.’

२. श्रीमती संगीता गुप्ता

गुरुपौर्णिमेनंतर शारीरिक आणि मानसिक त्रास उणावून हलकेपणा जाणवणे : ‘गुरुपौर्णिमेच्या आधीपासूनच मला पुष्कळ शारीरिक आणि मानसिक त्रास होत होते. मला कशाचाच उत्साह वाटत नव्हता. गुरुपौर्णिमेनंतर रात्री घरी पोचल्यावर मला पुष्कळ हलकेपणा जाणवून मानसिक त्रासही पुष्कळ उणावला. (डिसेंबर २०१९)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या आणि संतांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक