पोलीस पाटील यांचे मानधन वाढीसाठीच्या प्रस्तावावर तातडीने निर्णय घ्या ! – रामराजे नाईक-निंबाळकर


सातारा, ११ जून (वार्ता.) – राज्यातील पोलीस पाटील यांच्या प्रलंबित मागण्या राज्य मंत्रीमंडळाच्या उपसमितीसमोर आल्या आहेत; मात्र त्यावर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. याविषयी मंत्रीमंडळ उपसमितीने तातडीने निर्णय घ्यावा, अशा सूचना विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी संबंधितांना दिल्या आहेत.

पोलीस पाटील हा ग्रामीण भागात कार्यरत असणारा प्रशासनाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यांना स्वसंरक्षणार्थ शस्त्र अनुमतीपत्र देणे, पोलीस पाटील नुतनीकरण कायमचे बंद करणे या संघटनेच्या मागण्या योग्य आहेत. पोलीस पाटील यांच्या लेखी परीक्षा घेऊन नियुक्ती केली असल्यामुळे त्यांच्या नुतनीकरणाची आवश्यकता नसल्याचे रामराजे यांनी स्पष्ट केले.