साधना म्हणजे काय ?

प.पू. पांडे महाराज यांचे अनमोल विचारधन

प.पू. पांडे महाराज

१. ‘लोकांना ‘साधना म्हणजे काय ?’, हे समजले नाही. व्यवहारातील काही न करणे आणि केवळ भगवंताच्या अनुसंधानात रहाणे, एवढेच कार्य करणे म्हणजे साधना ! भगवंतच सर्व करत आहे, करवून घेत आहे, तुम्हाला काहीच करायचे नाही.

२. प्रत्येक कर्म ही साधना आहे. ‘प्रत्येक कर्म करतांना साधकाचा प्रत्येक क्षण साधनेत जावा’, हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा उद्देश आहे. भगवंताविना दुसरा विचार नाही, म्हणजे साधना !

३. मायेचे आवरण काढून आत्म्याची अनुभूती घेणे, ही साधना आहे.’

– प.पू. परशराम पांडे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (६.३.२०१७)