विद्याधर नारगोलकर यांना ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी’ पुरस्कार प्रदान !

श्री. विद्याधर नारगोलकर

पुणे, १० जून (वार्ता.) – अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, नाशिक यांच्या पुणे केंद्राच्या वतीने ७ जून या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १३८ व्या जयंतीनिमित्त ‘स्वातंत्र्यवीर सावरकर प्रेमी’ पुरस्कार स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती प्रतिष्ठानचे महामंत्री विद्याधर नारगोलकर यांना प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या कार्यक्रमाला भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार चंद्रकांत पाटील, तसेच क्रिएटिव्ह फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष संदीप खर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ‘सकाळ’ वृत्तपत्राचे मुख्य वार्ताहर संभाजी पाटील हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर पुणे केंद्र कार्यकारणी कार्यक्रमाचे संयोजक होते.