संभाजीनगर येथे ‘कमोडिटी ट्रेड आर्ट’च्या व्यवसायात ३० हून अधिक लोकांची २ कोटी रुपयांची फसवणूक !

संभाजीनगर – ‘कमोडिटी ट्रेड आर्ट’च्या व्यवसायात गुंतवणुकीचे आमीष दाखवून वर्ष २०१९ मध्ये शहरातील ३० हून अधिक लोकांना २ कोटी रुपयांचा गंडा घालणारा भामटा प्रशांत धुमाळ (वय ४७ वर्षे) याला २ वर्षांनंतर आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी वाघोली (पुणे) येथे ८ जून या दिवशी अटक केली. शहरातील अनिलकुमार जैस्वाल (वय ३० वर्षे) यांच्याशी ओळख करून प्रशांत आणि त्याची पत्नी भावना या दोघांनी ‘कमोडिटी ट्रेड आर्ट’ या व्यवसायात गुंतवणूक केल्यास दामदुप्पट परतावा, तसेच मासाला १० टक्के व्याज देण्याचे आमीष जैस्वाल यांना दाखवले. थोडी थोडी रक्कम घेत प्रशांत याने जैस्वाल यांची ७ लाख रुपयांची फसवणूक केली. या संदर्भात जैस्वाल यांनी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी प्रशांत, पत्नी भावना, त्याचे नातेवाइक आणि साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला.