नवी मुंबई विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी आंदोलन !

साखळी आंदोलन करतांना कार्यकर्ते

नवी मुंबई – नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे, या मागणीसाठी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापासून नवी मुंबई-पनवेल-उरणपर्यंत साखळी आंदोलन करण्यात आले. आघाडी सरकारमधील पक्ष वगळता सर्व राजकीय पक्षांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. सिडकोने नुकतेच या विमानतळाला ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्याचा ठराव केला आहे. राज्यशासनही बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही असल्याने स्थानिक शेतकर्‍यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. नवी मुंबई, पनवेल, उरण, ठाणे, मुंबई येथील आगरी-कोळी जनतेकडून हे आंदोलन उत्स्फूर्तपणे करण्यात आले.