ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांवरील अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्या !- मराठा क्रांती मोर्चाचे पोलीस अधीक्षकांना निवेदन


सांगली, ६ जून – ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील रुग्णालयामधील डॉक्टरांसह ५ जणांच्या विरोधात रुग्णांचे नातवाईक यांना हाताशी धरून अ‍ॅट्रॉसिटीचे खोटे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. राजकीय दबावापोटी हे गुन्हे कोणतेही अन्वेषण न करता नोंद करण्यात आले आहेत. तरी ईश्‍वरपूर (जिल्हा सांगली) येथील प्रकाश रुग्णालयाच्या डॉक्टरांवरील अ‍ॅट्रॉसिटीचे गुन्हे मागे घ्यावेत; अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सांगली पोलीस अधीक्षकांना देण्यात आले आहे.

हा प्रकार म्हणजे राज्यात कोरोनायोद्धा म्हणून काम करणार्‍यांचा अपमान असून कायद्याचा अपवापर करणार्‍या प्रवृत्तीवर कारवाई करावी, अशी मागणीही त्या निवेदनात करण्यात आली आहे.