इस्लामची निंदा केल्याच्या प्रकरणी जकार्ताच्या गव्हर्नर यांना २ वर्षांची शिक्षा !

इस्लामी इंडोनेशियाचा कट्टरतावाद !

जकार्ता (इंडोनेशिया) – जकार्ताचे गव्हर्नर बासुकी जाहाजा पुरनामा यांना इशनिंदेच्या प्रकरणी दोषी ठरवून त्यांना २ वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. कुराणने मुसलमानांवर मुसलमानेतरांना मत देण्यासाठी बंदी घातलेली नाही, असे आवाहन पुरनामा यांनी केले होते. या वक्तव्यावरून त्यांना शिक्षा करण्यात आली.