कोरेगाव (सातारा) तालुक्यातील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी रोखली गोमांस वाहतूक

गोवंशियांचे मांस पकडून देणार्‍या श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांचे अभिनंदन !

श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी आणि पोलीस कर्मचारी

सातारा, २४ मे (वार्ता.) – कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गोवंशियांच्या मांसाची वाहतूक करणारे वाहन पकडून वाठार पोलिसांच्या कह्यात दिले. (जे धारकरी करू शकतात, ते पोलीस प्रशासन का करू शकत नाही ? – संपादक)

फलटण पोलिसांना चकवा देत पहाटे ३ वाजता गोवंशियांच्या मांसाची वाहतूक चालू होती. याविषयी श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांना माहिती मिळाली. त्यांनी वाठार स्टेशन येथील चौकामध्ये गोवंंशियांच्या मांसाची वाहतूक करणारे वाहन पकडले. वाहनामध्ये २.५ टन गायींचे आणि बैलांचे मांस होते. श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी शिवम शामराव चव्हाण यांनी वाठार पोलिसांत तक्रार दिली असून वाहनचालक महादेव कुंभार आणि त्याचा सहकारी अक्षय कुंभार यांच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. (कठोर कारवाई होत नसल्यानेच गोवंश हत्याबंदी कायदा असूनही सर्रास त्याचे उल्लंघन केले जाते, असे म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)