कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश पाकला अमान्य

पाक आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा आदेश स्वीकारील अशी अपेक्षा नव्हती, त्यामुळे भारताने अशा निरर्थक गोष्टींत वेळ घालवण्यापेक्षा पाकला समजेल आणि जाधव यांची सुटका होईल, अशीच कृती करण्याची आवश्यकता आहे !

इस्लामाबाद – आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा आदेश दिला होता; मात्र हा आदेश मान्य नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या मुख्यालयात १५ मेपासून कुलभूषण जाधवप्रकरणी सुनावणीला प्रारंभ होणार आहे. कुलभूषण जाधव यांना सुनावण्यात आलेली फाशीची शिक्षा व्हिएन्ना कराराच्या विरोधात असल्याचे भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयाला सांगितले आहे. भारताने प्रविष्ट केलेल्या याचिकेवरील सुनावणीचे थेट प्रक्षेपण होणार आहे. संयुक्त राष्ट्रांकडून अधिकृतपणे याविषयीची माहिती देण्यात आली आहे.