परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवकाळात गरुडाने सनातनचे साधक सेवा करतात त्या ठिकाणी प्रदक्षिणा घालणे

पक्षीराज गरुड प्रदक्षिणा घालून दैवी प्रचीती देतांना

१. कलियुगातंर्गत कलियुगात पृथ्वीवर रामराज्य, म्हणजे ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करण्याचे ईश्‍वरी कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. आठवले श्रीविष्णूचे अंशावतार असणे

कु. प्रियांका लोटलीकर

‘परात्पर गुरु डॉ. आठवले सध्याच्या कलियुगांतर्गत कलियुगात पृथ्वीवर रामराज्य, म्हणजेच हिंदु राष्ट्राच्या स्थापनेचे महान कार्य करत आहेत. पृथ्वीवर रामराज्य, म्हणजे ईश्‍वरी राज्य (हिंदु राष्ट्र) स्थापन करणे, हे श्रीविष्णूचे अवतारी कार्य आहे. तेच कार्य आज परात्पर गुरु डॉ. आठवले करत आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार असल्याचे महर्षींनी विविध नाडीपट्ट्यांच्या माध्यमातून सांगितले आहे. अनेक संतही त्यांच्या कार्याचा गौरव ईश्‍वरी कार्य असा करतात.

२. परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार असल्याची दैवी प्रचीती नागेशी येथे सेवा करणार्‍या साधकांच्या ठिकाणी गरुडांनी प्रदक्षिणा घातल्याने मिळणे

परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अंशावतार असल्याची दैवी प्रचीती विविध माध्यमांतून मिळत असते. तशीच प्रचीती १.५.२०२१ या दिवशी वेळीही मिळाली. १ मे या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत नागेशी येथे साधक सेवा करत असलेल्या ठिकाणी सर्व पक्ष्यांचा राजा असलेला पक्षीराज गरुड प्रदक्षिणा घालत असल्याचे लक्षात आले. पक्षीराज गरुड म्हणजे श्रीविष्णूचे वाहन आहे. श्रीविष्णूचा अंशावतार असलेल्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येच्या वेळी गरुडाने प्रदक्षिणा घालून परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कार्य दैवी असल्याचा संकेत दिला.

३. कृतज्ञता

​श्रीविष्णूचे अंशावतार असलेले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यामुळे सनातनच्या साधकांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची संधी मिळत आहे आणि या समष्टी कार्यासमवेत साधकांची व्यष्टी साधनेत प्रगती होऊन ते जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होऊन मोक्षाकडे वाटचाल करत आहेत. यासाठी आम्ही सर्व साधक त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– कु. प्रियांका लोटलीकर, संशोधन-विभाग समन्वयक, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय. (१.५.२०२१)