सदैव साधका पुढेच जायचे । न मागुती तुवा कधी फिरायचे ॥

(परात्पर गुरु) डॉ. आठवले

आपत्काळ हे काळानुसार येणारे तात्कालिक संक्रमण आहे. सनातनच्या साधकांना परात्पर गुरुदेवांनी दिलेले मोक्षप्राप्तीचे ध्येय हेच चिरंतन आहे ! त्या ध्येयातील वाटचालीत येणारे आपत्काळासम अनेक अडथळे गुरुदेवांच्या कृपेने लीलया मागे पडतील ! गुरुदेवांनी दर्शवलेल्या आनंदप्राप्तीच्या साधनापथावर निष्ठेने मार्गक्रमण करत रहाण्यासाठी साधकांना प्रेरणा देणारे हे काव्य !

सदैव साधका पुढेच जायचे ।

न मागुती तुवा कधी फिरायचे ॥ धृ ॥

तू न केवळ तारक उपासक ।

तू धर्मवीर हो, जे रूप मारक ।

शूर तू खरा अखंड लढायचे ।

सदैव साधका पुढेच जायचे ॥ १ ॥

झडे देहबुद्धी वासना अहं ।

लये मन-बुद्धी जागवे सोऽहम् ।

गुर्वाज्ञा ती आता पाळीत जायचे ।

सदैव साधका पुढेच जायचे ॥ २ ॥

काळ धावतो अमूल्य जो तुला ।

उपयोगी क्षणक्षण कर तू साधना ।

भान काळाचे सदा राखायचे ।

सदैव साधका पुढेच जायचे ॥ ३ ॥

ढाल गुरुकृपा श्रद्धा अंतरी ।

भीती ना मनी आनंद अंतरी ।

साधना म्हणून कार्य करायचे ।

सदैव साधका पुढेच जायचे ॥ ४ ॥

– एका साधिकेला स्फुरलेले प्रेरणादायी काव्य

साधकांसाठी परात्पर गुरु डॉक्टरांचे आश्‍वासक बोल !

​‘आपत्काळ येण्यापूर्वी अनेक संत देहत्याग करतील. मी मात्र तुम्हा साधकांसमवेत शेवटपर्यंत, म्हणजे संपत्काळ येईपर्यंत (हिंदु राष्ट्र स्थापन होईपर्यंत) असेन.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले