श्रीलंकेत ख्रिस्ती मूलतत्त्ववाद्यांनी गणेश मंदिर उद्ध्वस्त केल्याच्या विरोधात तमिळनाडूतील श्रीलंकेच्या दुतावासाकडे तक्रार

श्रीलंकेच्या दूतावासातील अधिकार्‍याला तक्रारीची प्रत देतांना हिंदुत्वनिष्ठ

चेन्नई – २३ एप्रिलच्या मध्यरात्री देवाणपिद्दीच्या कॅथलिक चर्चच्या पाद्य्राने पुढाकार घेऊन श्रीलंकेतील मन्नार जिल्ह्यातील वेल्लानाकुलम् येथील पिल्लईर मंदिर आणि हिंदूंची घरे उद्ध्वस्त करण्यासाठी काही गुंड हाताशी धरून आक्रमण केले. यात मंदिर उद्ध्वस्त करून मूर्तींची तोडफोड करण्यात आली. याविषयी चेन्नई येथील हिंदू मक्कल कत्छीचे नेते श्री. रवीकुमार आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी चेन्नईतील श्रीलंकेच्या दूतावासात सदर अत्याचारांविरुद्ध तक्रार दाखल केली.