दळणवळण बंदीमुळे ‘सनातन प्रभात’च्या वितरणात येत असलेल्या अडचणींविषयी वाचकांना आवाहन

सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे शनिवार आणि रविवार, अशी २ दिवसांची दळणवळण बंदी लागू करण्यात आली आहे. या पार्श्‍वभूमीवर काही ठिकाणी बसवाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये बसमधून ‘दैनिक सनातन प्रभात’चे अंक पाठवले जातात. ही वाहतूक बंद असल्यामुळे हे अंक वाचकांपर्यंत वेळेत पोचवण्यात अडचणी येत आहेत. दळणवळण बंदीचे नियम पाळून जिथे अंक पोचवणे शक्य आहे, तेथे अंक पोचवण्याचा आम्ही निश्‍चितच प्रयत्न करत आहोत; मात्र जिथे अंक पोचवणे शक्य नाही, अशा भागांमध्ये सोमवारी दळणवळण बंदी उठल्यावर ३ दिवसांचे एकत्रित अंक वाचकांपर्यंत पोचवले जातील. वाचकांच्या होणार्‍या या गैरसोयीविषयी आम्ही दिलगीर आहोत.

गेल्या वर्षभरामध्ये दळणवळण बंदीच्या काळात ज्या ज्या वेळी ‘सनातन प्रभात’च्या वितरणामध्ये अडचणी निर्माण होऊन अंक वाचकांपर्यंत पोचवणे शक्य झाले नाही, त्या त्या वेळी आमच्या सर्व वाचकांनी ही अडचण लक्षात घेऊन आम्हाला सहकार्य केले आहे. अशाच प्रकारे यापुढेही आपले आम्हाला सहकार्य मिळत राहील याची आम्हाला खात्री आहे. – संपादक