६७ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या सौ. सुप्रिया माथुर यांनी साधकांना स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया सत्संगात केलेल्या अमूल्य मार्गदर्शनातील सूत्रे

रामनाथी, गोवा येथील सनातन संस्थेच्या आश्रमात सौ. सुप्रिया माथुर साधकांना स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रियेविषयी मार्गदर्शन करतात. रामनाथी आश्रमातील ६८ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या कु. प्रियांका लोटलीकर यांना स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया सत्संगात सौ. सुप्रिया माथुर यांनी केलेल्या मार्गदर्शनातील शिकायला मिळालेल्या सूत्रांतील काही निवडक सूत्रे पुढे देत आहोत.

सौ. सुप्रिया माथूर
कु. प्रियांका लोटलीकर

१. ‘स्वभावदोष आणि अहंनिर्मूलन प्रक्रिया हे बंधन नसून ती मनातील अडथळे दूर करून मनाला ऊर्जा पुरवण्याची प्रक्रिया आहे. (१२.८.२०२०)

. आपल्यातील स्वभावदोष आणि अहं हे आपल्या मनाला लागलेले रोग असतात आणि स्वभावदोषांची जाणीव करवून देण्यासाठी घेण्यात येणारा सत्संग हा मनाला अंतर्मुख करणारी संजीवनी आहे.

३. पूर्वीच्या काळी ऋषिमुनी ज्याप्रमाणे अनेक वर्षे साधना करायचे; परंतु त्यांच्यातील काही दोष अल्प होत नसत, उदा. साधनेमध्ये व्यत्यय आणल्यास त्यांना राग येत असे आणि ते त्यासाठी लगेचच शापही देत असत, अशी अनेक उदाहरणे आहेत. परात्पर गुरु डॉक्टर आठवले आपल्यातील स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन करून आपल्याला मनाच्या स्तरावरील तप करायला शिकवत आहेत. (२.९.२०२०)

४. साधना ही औपचारिकता नसून प्रत्यक्ष, तळमळीने आणि चिकाटीने आचरणात आणण्याची कृती आहे. असे केले तरच आपण देवाशी एकरूप होऊ शकतो.’ (१३.९.२०२०)

– कु. प्रियांका लोटलीकर, महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय, गोवा