श्री तुळजाभवानी मंदिरात घटस्थापनेने नवरात्रोत्सवास प्रारंभ

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर भाविकांना शहरात प्रवेशबंदी

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) – साडेतीन शक्तीपीठांतील एक शक्तीपीठ असलेली श्री भवानीदेवीच्या नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला आहे. संस्थानचे अध्यक्ष जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी सपत्नीक मंदिरात विधिवत् पूजा करून घटस्थापना केली. या वेळी जिल्हाधिकारी दांपत्यासह मंदिरात पुजारी, महंत, सेवेकरी आणि पुरोहित उपस्थित होते.

९ ऑक्टोबरपासून १७ ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत देवी पलंगावर मंचकी निद्रेत होती. १७ ऑक्टोबरच्या पहाटे देवीच्या मूर्तीची पलंगावरून सिंहासनावर प्रतिष्ठापना करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इतिहासात प्रथमच भाविकांविना नवरात्रोत्सव पार पडत आहे. भाविकांनी मंदिरात गर्दी करू नये, यासाठी शहरात भाविकांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

भाविकांना देवीचे ऑनलाईन दर्शन घेता यावे यासाठी https://shrituljabhavani.org/LiveShriTuljabhavani.html ही लिंक उपलब्ध करून देवीचे दर्शन घेण्याची सोय करण्यात आली आहे.