पुण्यातील भिडे पुलावरून सेल्फी काढणे २ तरुणांच्या जिवावर बेतले

पुणे – शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. मुळा-मुठा नदीमधून वहात जाणारे पाणी पहाण्यास १६ ऑक्टोबर या दिवशी संध्याकाळी भिडे पुलावर आलेल्या ३ मित्रांपैकी दोघे सेल्फी काढत असतांना एकजण पाय घसरून पाण्यात पडला. मित्राला वाचवण्यासाठी दुसर्‍याने पाण्यात उडी मारली; मात्र पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने तोही वाहून गेल्याची घटना घडली आहे.