तालीम आणि व्यायामशाळा उघडण्यासाठी भाजपचे १८ ऑक्टोबर या दिवशी आंदोलन ! – धीरज सूर्यवंशी, अध्यक्ष, भाजप युवामोर्चा 

सांगली, १७ ऑक्टोबर (वार्ता.) – कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरोग्यही उत्तम असणे आवश्यक आहे. असे असतांना सरकारने मद्यालये, उपहारगृहे चालू करतांना तालीम आणि व्यायामशाळा (जीम) यांना मात्र अनुमती दिलेली नाही. यामुळे युवांना शरीर सदृढ ठेवण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत. तरी तालीम आणि व्यायामशाळा (जीम) उघडण्यासाठी भाजप युवा मोर्चाच्या वतीने १८ ऑक्टोबर या दिवशी सकाळी १० वाजता विश्रामबाग चौक येथे आंदोलन करण्यात येणार आहे. तरी सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील सर्व तालीम आणि व्यायामशाळा (जीम) व्यवस्थापकांनी आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन भाजप युवा मोर्चा सांगली शहर जिल्हाध्यक्ष आणि नगरसेवक श्री. धीरज सूर्यवंशी यांनी केले आहे.