मार्च २०२१ पर्यंत भारताला कोरोनावरील लस मिळू शकेल !

पुण्यातील ‘सिरम इन्स्टिट्यूट’चा दावा

सिरम इन्स्टिट्यूट

पुणे – कोरोनाच्या संसर्गाला अटकाव करण्यासाठी जगभरात प्रयत्न चालू असून मार्च २०२१ पर्यंत भारताला कोरोनावरील लस मिळू शकते, असे ‘सिरम इन्स्टिट्यूट’चे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी सांगितले आहे. ‘सिरम इन्स्टिट्यूट’ हे जगातील सर्वांत मोठे लस उत्पादक आस्थापन आहे. कोरोनाचा फैलाव रोखणार्‍या लसीच्या निर्मितीच्या संदर्भात सिरमने केवळ ऑक्सफर्ड-अस्राझेनेकाच नव्हे, तर जगातील वेगवेगळ्या लस संशोधन करणार्‍या संस्थांसमवेत करार केले आहेत.

कोरोना विषाणूवरील लसीच्या संदर्भात जानेवारी २०२१ पर्यंत आपल्याला परिणाम दिसेल आणि २०२१ च्या दुसर्‍या तिमाहीपर्यंत कोरोना विषाणूच्या विरोधात लस तयार व्हायला हवी, असे मत जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन् यांनी व्यक्त केले.