पंढरपूर येथील महापूर ओसरत असल्याने पुलांवरील वाहतूक सुरळीत चालू होणार  

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – भीमा नदीला आलेल्या पुरामुळे पंढरपूर शहराच्या अनेक भागांत शिरलेले पाणी न्यून झाले आहे. पूर ओसरल्यामुळे नागरिक आणि महापालिका यांनी स्वच्छता मोहीम चालू केली. सर्व पुलांवरील पाणी न्यून झाल्याने पडताळणी करून पूल वाहतुकीसाठी चालू होणार आहेत. १६ ऑक्टोबरला उजनी आणि वीर धरणातून सोडण्यात येणारे पाणी भीमा नदीत आल्याने भीमा नदीला पूर आला होता. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यासमवेत ठिकठिकाणच्या ओढ्या-नाल्याचे पाणीही नदी पात्रात मोठ्या प्रमाणात मिसळले होते.