पत्रकारांशी संवाद साधतांना ‘समाजात वेगाने धर्मप्रसार होईल’, हे लक्षात येणे

‘भिवंडी, जिल्हा ठाणे येथे ‘पत्रकार संवाद कार्यक्रमा’विषयी पत्रकारांशी भेटणे झाले. त्या वेळी ‘साक्षी’ या दैनिकाचे भिवंडी प्रतिनिधी हिंदुत्वनिष्ठ असल्याचे समजले. त्यानुसार मी त्यांना संपर्क केला. त्यांच्याशी बोलतांना ‘हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची त्यांना माहिती होती’, असे लक्षात आले. चर्चा करतांना बर्‍यापैकी ते सकारात्मक असल्याचे लक्षात आल्यावर मी त्यांना नामजप आणि साधनेचे महत्त्व सांगितले. त्यानंतर त्यांची ऐकण्याची रुची वाढत गेली. हिंदु जनजागृती समितीचे कार्य, हिंदु धर्मावर होणारे आघात आणि त्यावर समिती वैध मार्गाने करत असलेला विरोध याविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तुम्हाला जे सहकार्य लागेल, ते मी करीन.’’ माझ्याकडून त्याविषयी श्रीकृष्णाच्या चरणी कृतज्ञता व्यक्त झाली. ‘देव सर्व करवून घेत आहे. आपल्याला केवळ लोकांपर्यंत पोचायचे आहे’, याची अनुभूती आली. त्यानंतर त्यांना ‘हलाल सर्टिफिकेशन’द्वारे धर्मांधांचे कार्य कशा प्रकारे चालू आहे’, हे सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘त्याविषयी हिंदूंमध्ये जागृती करायला हवी. तसेच इतर पत्रकारांना हा विषय सांगायला हवा.’’ यावरून ‘आपण पत्रकारांना भेटून नवीन विषय त्यांच्यापर्यंत पोचवायला हवेत’, हे शिकायला मिळाले. त्यांच्यापर्यंत हे विषय पोचल्यावर ‘त्यांच्या संपर्कातील इतर पत्रकारांशी त्यांनी केलेल्या चर्चेमुळे हे विषय समाजात अधिक प्रभावीपणे आणि इतर दैनिक, वृत्तवाहिनी यांच्या माध्यमातून मांडले जाऊ शकतात’, असे वाटले.

– एक कार्यकर्ता, डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२६.१.२०२०)