बिहार येथील जिज्ञासूंनी ‘ऑनलाईन’ नामजप आणि धर्मसंवाद सत्संग ऐकून व्यक्त केलेले मनोगत !

१. ‘ऑनलाईन’ सत्संगात ‘विवाह संस्कार’ याविषयी सांगण्यात आले. त्यांनी सांगितलेले शास्त्र मला ठाऊक नव्हते. मला नवीन माहिती समजली. ‘ऑनलाईन’ सत्संगाचे कार्यक्रम चांगले आहेत. आम्ही ते प्रतिदिन ऐकण्याचा प्रयत्न करतो.’ – श्री. रंजन श्रीवास्तव, सोनपूर

२. ‘आम्ही सत्संग ऐकतो. सत्संगात चांगल्या प्रकारे शुद्ध हिंदी भाषेचा उपयोग केला जातो. ‘आम्हीही तसेच हिंदी बोलायला पाहिजे’, असे मला वाटते.  सत्संग घेणार्‍या साधकांच्या बोलण्यात शालीनता आणि शांती जाणवते. त्यामुळे आम्हाला पुष्कळ चांगले वाटते.’ – श्री. रजनीश कुमार, बागमली, हाजीपूर

३. भागलपूर येथील जिज्ञासू सौ. नेहा केजरीवाल यांनी ‘पितृदोष’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकला. त्यांनी सत्संगानंतर स्वतःहून साधकांना संपर्क केला आणि श्राद्धविधीच्या संदर्भात समजून घेतले अन् अन्य शंकाही विचारल्या. त्यांना ‘श्री गुरुदेव दत्त ।’ या नामजपाचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी नामजप करायला आरंभ केला. त्यांनी सांगितले, ‘‘आताच्या महिला सनातन धर्मातील मूल्यांना मानत नाहीत; परंतु मी हे सर्व मानते आणि करते, उदा. कुंकू लावणे, पूजा आणि आरती करणे इत्यादी.’’

४. ‘आपले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. तुमचे पुष्कळ पुष्कळ अभिनंदन !’ – श्री. नागेंद्र ओझा, मुझफ्फरपूर

५. ‘ऑनलाईन’ सत्संगामुळे मला आपल्या संस्कृतीविषयी पुष्कळ महत्त्वाची माहिती मिळत आहे.’ – श्री. अंकित भारद्वाज, मुझफ्फरपूर

६. ‘मला ‘ऑनलाईन’ सत्संगातून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली.’ – श्री. अभयकांत झा, पूर्णिया (सेवानिवृत्त बँक व्यवस्थापक) (ते बिहारमध्ये होत असलेले ‘ऑनलाईन’ सत्संग ऐकतात. त्यांनी सनातन प्रकाशित ग्रंथांची मागणी केली आहे. दळणवळण बंदी संपल्यानंतर त्यांच्या भागात प्रसार करण्यासाठी त्यांनी साधकांना आमंत्रित केले आहे.)

७. ‘ऑनलाईन’ उद्योगपती सत्संग’ ऐकल्यानंतर मला पुष्कळ चांगले वाटले. मला पुष्कळ महत्त्वाची माहिती मिळाली.’ – श्री. भानुप्रताप सिंह, गया (त्यांनी सत्संग संपल्यानंतर साधकाला संपर्क करून कार्यक्रमाची प्रशंसा केली. त्यांनी त्यांच्या आयुष्यातील त्रासांविषयी मनमोकळेपणे सांगून ‘कुलदेवतेचा नामजप कसा करायचा ?’, हे विचारले. त्यांनी पूर्वजांचे त्रास दूर होण्यासाठी नामजपादी उपाय विचारले.)