विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस करणार राज्यातील अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या भागांची पहाणी

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस १९ ऑक्टोबरपासून राज्यात ३ दिवसांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यामध्ये ते राज्यातील अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या भागाची पहाणी करतील. १९ ऑक्टोबर या दिवशी बारामती, पुणे आणि सोलापूर, २० ऑक्टोबर या दिवशी धाराशिव, लातूर, बीड आणि परभणी, तर २१ ऑक्टोबर या दिवशी हिंगोली, जालना, संभाजीनगर या जिल्ह्यांचा दौरा ते करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हेही १८ आणि १९ ऑक्टोबर या दिवशी मराठवाड्यातील भागाची पहाणी करणार आहेत.