सामाजिक माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी अधिवक्त्यांना अटक

अभिनेते सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

मुंबई – अभिनेते सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सामाजिक माध्यमांवर अफवा पसरवणे, या प्रकरणाशी काही संबंध नसलेल्यांची अब्रूहानी करणे याप्रकरणी देहलीतील अधिवक्ता विभोर आनंद यांना अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे.

मुंबई पोलीस गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले की, सुशांतसिंग राजपूत आणि दिशा सालियन यांच्या मृत्यू प्रकरणात आरोपी विभोर आनंद यांनी बनावट कथा रचून ती सामाजिक माध्यमांवर पसरवली होती. ते मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकार यांच्या विरोधात आक्षेपार्ह भाषा वापरत होते.

 

सुशांतच्या मृत्यूनंतर मुंबई पोलिसांना ट्रोल आर्मी आणि बनावट सामाजिक माध्यमांवर लक्ष्य केले जात होते. देश-विदेशातून सरकार आणि पोलीस यांच्या विरोधात अफवा पसरवल्या जात होत्या. सुशांत प्रकरणात चुकीच्या गोष्टी लिहिल्या जात होत्या. या संपूर्ण प्रकरणाचा तपास सायबर सेलकडून घेतला जात आहे.