अतीवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ घोषित करावा ! – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते, विधानसभा

देवेंद्र फडणवीस

मुंबई – महाराष्ट्रातील ज्या भागात अतीवृष्टी झाली आहे, त्या भागातील शेतकर्‍यांना तातडीने धीर देण्याची आवश्यकता आहे. अतीवृष्टी झालेल्या भागात ओला दुष्काळ घोषित करून शेतकर्‍यांना भरीव आर्थिक साहाय्य करावे, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्राद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. याविषयी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अशी मागणी केली आहे.