शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपिठावरच होणार ! – संजय राऊत, शिवसेना

संजय राऊत

मुंबई – शिवसेनेचा दसरा मेळावा व्यासपिठावरच होणार आहे, असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे. ‘या दसरा मेळाव्याला राजकीय आणि सांस्कृतिक महत्त्व आहे. दसरा मेळावा कसा घ्यायचा, याविषयी चर्चा होईल. नियम आणि आरोग्य यांच्या दृष्टीने योग्य होईल, अशा पद्धतीचे नियोजन केले जाईल’, असे संजय राऊत यांनी सांगितले आहे. कोरोनामुळे शिवसेनेचा यंदाचा दसरा मेळावा ‘ऑनलाईन’होणार असल्याची चर्चा होती; मात्र संजय राऊत यांनी त्याविषयी काहीही म्हटले नाही.

‘कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सगळ्या गोष्टी ‘ऑनलाईन’ होत आहेत; पण मी आजच वाचले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बिहारमध्ये १२ सभा घेणार आहेत. ते त्या कशा प्रकारे घेतात, याचा आम्ही अभ्यास करू आणि कोणत्याही नियमांचे उल्लंघन होणार नाही’, असे राऊत यांनी सांगितले.