विजेची चोरी करणार्‍यांकडून साडेआठ कोटी रुपयांची वसुली

केवळ दंड वसुली करून नव्हे, तर अटकेची कारवाई केली, तरच वीज चोरीच्या घटनांना चाप बसेल !

मुंबई – बेस्ट उपक्रमाने विजेची चोरी करणार्‍या १ सहस्र ४०७ वीजचोरांकडून साडेआठ कोटी रुपयांची वसुली केली आहे. वर्ष २०१९-२०२० मध्ये ही कारवाई केल्याची माहिती बेस्ट उपक्रमाने दिली.


छोटे-मोठे उद्योगधंदे करणार्‍यांपासून घरगुती वीज वापरणार्‍यांकडून मीटरमध्ये फेरफार केलेले आढळतात. अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्येही अवैध जोडणी करून वीज वापरली जाते. अशा वीजचोरांवर बेस्टच्या विद्युत विभागातील दक्षता पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. दक्षता विभागाने अँटॉप हिल, धारावी, दारूखाना, कर्णाक बंदर, कुलाब्यातील गीता नगर या भागांत कारवाई केली आहे. धारावीत प्लास्टिक वितळवून त्यापासून वस्तू बनवणारे काही कारखाने आणि झोपड्या यांमधूनही वीजचोरी होत असल्याचे सांगण्यात आले.