सिंधुदुर्गात आतापर्यंत ३ सहस्र ८६१ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात गेल्या २४ घंट्यांत नवीन २७ कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने कोरोनाबाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ४ सहस्र ५४७ झाली आहे. त्यांपैकी आतापर्यंत ३ सहस्र ८६१ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एकूण ११७ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित ८ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. जिल्ह्यात सद्य:स्थितीत ५६९ रुग्णांवर उपचार चालू आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली.