१५ वर्षे लैंगिक शोषण करणार्‍याची पीडितेकडून हत्या

स्वतःहून पोलिसांना दिली हत्येची माहिती

भोपाळ (मध्यप्रदेश) – राज्यातील गुना जिल्ह्यात एका महिलेने बलात्काराचा प्रयत्न करणार्‍या आणि वारंवार ब्लॅकमेल करणार्‍या बृजभूषण शर्मा नावाच्या व्यक्तीची चाकू भोसकून हत्या केली. शर्मा गेल्या १५ वर्षांपासून अत्याचार करत होता, असा आरोप पीडित महिलेने केला आहे.

१. पीडित महिला १६ वर्षांची असल्यापासून शर्मा तिच्यावर अतिप्रसंग करण्यात येत होता. त्यानंतर सातत्याने धमकी देऊन त्याने तिच्याशी संबंध ठेवले. पीडित महिलेने एका शिक्षकाशी विवाह केला. विवाह केल्यानंतरही शर्मा तिला वारंवार धमकी देत होता.

२. हत्येच्या दिवशी पीडित महिला घरी एकटीच होती. ही संधी साधून शर्मा तिच्या घरी आला. तो दारूच्या नशेत होता. त्याने या महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यावर तिने चाकूने भोसकून त्याची हत्या केली. जोपर्यंत त्याचा मृत्यू होत नाही,  तोपर्यंत महिलेने २५ वेळा चाकूने वार केले. त्यानंतर महिलेने स्वत: पोलीस ठाण्यात दूरभाष करून हत्येची माहिती दिली. याप्रकरणी या महिलेला अटक करण्यात आली आहे.