रशियाच्या मध्यस्थीनंतरही आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यातील युद्ध पुन्हा चालू

बाकू (अझरबैजान) – रशियाने केलेली मध्यस्थी अयशस्वी ठरल्यामुळे आर्मेनिया आणि अजरबैझान यांच्यामध्ये नागोर्नो-काराबाख येथे पुन्हा युद्ध चालू झाले आहे. सैन्यांच्या ठिकाणांवर अजरबैझानने केलेल्या आक्रमणावर आर्मेनियाने दिलेल्या प्रत्युत्तरात १२ नागरिक ठार झाले असून ४० हून अधिक घायाळ झाले असल्याचे अजरबैझानने म्हटले आहे.


रशियाने मध्यस्थीचा प्रयत्न केल्यानंतर दोन्ही देशांनी शस्त्रसंधीही लागू केली होती; मात्र शस्त्रसंधी मोडल्याचा आरोप दोन्ही देशांनी एकमेकांवर केला आणि त्यानंतर पुन्हा युद्धाला तोंड फुटले.