भाग्यनगर (तेलंगाणा) येथे एका तरुणीवर केकमधून झोपेच्या गोळ्या देऊन सामूहिक बलात्कार

बलात्कार्‍यांना तात्काळ कठोर शिक्षा होत नसल्याने इतरांवर वचक बसत नाही आणि त्यामुळेच अशा घटना थांबत नाहीत, हे लक्षात घ्या !

भाग्यनगर (तेलंगाणा) – येथे एका विद्यार्थिनीला केकमधून झोपेच्या गोळ्या  देऊन तिच्यावर तिघा तरुणांकडून सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना येथील कुकटपल्ली भागात काही दिवसांपूर्वी घडली. ती आता समोर आली आहे.

५ ऑक्टोबरला २० वर्षीय एम्. जोसेफ याने त्याच्या वाढदिवशी आयोजित मेजवानीला या विद्यार्थिनीला बोलावले होते. ३ मासांपूर्वीच जोसेफ याची तिच्याशी ओळख झाली होती. मेजावनीच्या वेळी नवीन रेड्डी आणि आर्. रामू हे दोघेही आले होते. येथे तिला केकमधून झोपेच्या गोळ्या देऊन या तिघांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तिला नंतर शुद्ध आल्यावर या तिघांनी तिला ‘याविषयी कुणालाही माहिती दिल्यास वाईट परिणम होतील’, अशी धमकी दिली होती. २ दिवसांनी तिला शारीरिक त्रास झाल्यावर तिने याची माहिती पालकांना दिल्यावर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली.