राजस्थानमधील काँग्रेस सरकार राज्यातील मदरशांवर प्रती १५ ते २५ लाख रुपये खर्च करणार

  • आसाममधील भाजप सरकारने सरकारी मदरसे बंद केले; म्हणून आता काँग्रेस सरकार मुसलमानांचे लांगूलचालन करण्यासाठी राज्यातील मदरशांवर सरकारी पैसा खर्च करत आहे, हेच यातून स्पष्ट होते !
  • काँग्रेस सरकार हिंदूंना वेदांचे शिक्षण देण्यासाठी, काशी यात्रा करण्यासाठी कधी असा पैसा खर्च का करत नाही ?

जयपूर (राजस्थान) – राजस्थानमधील काँग्रेस सरकार राज्यातील मदरशांचा सरकारी पैशांतून विकास करणार आहे. (हे आहे काँग्रेसच्या ‘धर्मनिरपेक्षते’चे खरे स्वरूप ! – संपादक) त्यासाठी १४ ते २९ ऑक्टोबर या काळात अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज केल्यानंतर सरकारकडून विकासासाठी मदरशांना पैसे मिळणार आहेत. याविषयीचे वृत्त ‘टाइम्स नाऊ’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केले आहे.

या वृत्तानुसार सरकार ९० टक्के, तर मदरसा बोर्ड १० टक्के खर्च करणार आहे. यासाठी सरकारने १५ ते २५ लाख रुपयांची मर्यादा निश्‍चित केली आहे. राजस्थान सरकारने मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी वर्ष २०१९ मध्ये ७ कोटी रुपये दिले आहेत.