भारतीय हिंदी मालिकेचे भाषांतर करून तुर्की भाषेत प्रसारण करतांना हिंदु देवतांच्या मूर्ती केल्या जात आहेत धूसर !

तुर्कस्थानच्या ‘कानल ७’ वाहिनीचा हिंदुद्वेष !

  • मालिकांमधील हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीही पाहू न इच्छिणारे तुर्की लोक कधीतरी सर्वधर्मसमभाव दाखवतील का ? हिंदु ‘वसुधैव कुटुंम्बकम्’ असे म्हणतात; मात्र धर्मांध तसे म्हणतात का ?
  • भारतात अन्य धर्मियांचे प्रतीक, चिन्हे, नावे आदी हिंदू धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली स्वीकारतात; मात्र धर्मांध ते स्वीकारत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – हिंदी मालिका ‘साथ निभाना साथिया’ ही सध्या तुर्की भाषेमध्ये भाषांतर करून ‘मासूम’ नावाने प्रसारित होत आहे. तुर्कस्थानच्या ‘कानल ७’ या वाहिनीकडून ही मालिका प्रसारित करतांना त्यामधील हिंदूंची धार्मिक चिन्हे आणि देवतांच्या मूर्ती असणारा भाग धूसर करण्यात आला आहे. एका प्रसंगामध्ये राधा आणि श्रीकृष्ण यांची मूर्ती दूर असल्याची दिसत आहे. तुर्की भाषेत प्रसारित करतांना मूर्ती दिसणारा भाग धूसर करण्यात आला आहे. तुर्कस्तानमधील मुसलमानांना हे पहावे लागू नये; म्हणून असे करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर सामाजिक माध्यमांतून आक्षेप घेण्यात येत आहे.

भारतीय मालिकांचे तुर्कस्तानमधील प्रसारण बंद करणे आवश्यक ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

काश्मीरप्रश्‍नी भारतविरोधी वक्तव्ये, पाकिस्तानविषयीचे धोरण यांविषयी तुर्कस्तानची नेहमीच भूमिका भारतविरोधी राहिली आहे. भारतातील हिंदी मालिका ‘साथ निभाना साथिया’ प्रसारित करतांना त्यामधील हिंदूंची धार्मिक चिन्हे आणि देवतांच्या मूर्ती असणारा भाग धूसर करण्यात आला आहे. एका प्रसंगामध्ये राधा आणि श्रीकृष्ण यांची मूर्ती दूर असल्याचे दिसत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा हिंदु-मुसलमान ऐक्याच्या गोष्टी करणारे या हिंदुद्वेषाचे उत्तर देऊ शकतात का ? भारतातील मालिका चालतात; पण हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती चालत नाहीत. इस्लामच्या दृष्टीने विचार केला असता अलीकडेच तुर्कस्तानमधील हगिया सोफिया नावाच्या चर्चचे रूपांतर मशिदीत करण्याची घोषणा करण्यात आली. बॉलिवूडमधील अभिनेते आमिर खान तुर्कस्तानच्या राष्ट्रपतींच्या पत्नीला भेटून त्यांचा पाहुणचार स्वीकारतात. ही स्थिती पहाता बॉलिवूडची कुठल्या दिशेने वाटचाल चालू आहे ? हिंदु धर्माला विरोध करण्यासाठी बॉलिवूड आणि तुर्कस्तान एकत्र आले आहेत का ? यासाठी भारत सरकारने तुर्कस्तानचा विरोध करून भारतीय मालिकांना तुर्कस्तानमध्ये प्रसारित करण्यास अनुमती देणे बंद केले पाहिजे.