(म्हणे) ‘श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणी संघ परिवार हिंसक अभियान चालू करील !’ – असदुद्दीन ओवैसी

मुळात हिंदूंची देशातील सहस्रो मंदिरे कुणी हिंसक होऊन पाडली, हे ओवैसी का सांगत नाहीत ? बाबरी ढाचा पाडल्यानंतर हिंसक होऊन कुणी हिंदूंच्या हत्या केल्या ? हे ओवैसी का सांगत नाहीत ? काश्मीरमध्ये हिंदूंच्या असंख्य मंदिरांवर १९९० च्या दशकात कुणी हिंसक होऊन आक्रमणे केली ?, हे ओवैसी का सांगत नाहीत ?

भाग्यनगर (तेलंगाणा) – ज्या गोष्टीची भीती वाटत होती, तीच होत आहे. बाबरीशी संबंधित निर्णयामुळे संघ परिवारातील लोकांचा उद्देश अधिक सशक्त झाला आहे. लक्षात ठेवा, जर तुम्ही आणि आम्ही गाढ झोपेमध्ये राहिलो, तर काही वर्षांनी संघ यावरही एक हिंसक अभियान चालू करील आणि काँग्रेसही या हिंसक अभियानाचा एक भाग बनेल, असे विखारी ट्वीट एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी मुसलमानांना उद्देशून केले आहे. जिल्हा न्यायालयाने मथुरेतील श्रीकृष्णजन्मभूमीच्या प्रकरणाची याचिका  प्रविष्ट करून घेतल्याच्या वृत्तावर ओवैसी यांनी हे ट्वीट केले आहे.