खलिस्तानी आतंकवाद्यांशी लढल्यामुळे ‘शौर्य चक्र’ पुरस्कार मिळालेले बलविंदर सिंह संधू यांची गोळ्या झाडून हत्या  

गेल्या वर्षी पंजाब सरकारने काढून घेतले होते संधू यांचे पोलीस संरक्षण

पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्यामुळे तेथे पुन्हा एकदा खलिस्तानी आतंकवाद वाढत आहे, त्याचेच ही घटना द्योतक आहे !

अमृतसर/ चंडीगड (पंजाब) – खलिस्तानी आतंकवाद्यांशी गेली ३० वर्षे लढणारे आणि त्यामुळे ‘शौर्य चक्र’ पुरस्काराने सम्मानित करण्यात आलेले ६२ वर्षीय बलविंदर सिंह संधू यांची तरण तारण जिल्ह्यातील भीखीविंड गावत त्यांच्या निवासस्थानी अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. आक्रमण करणारे दोघे होते आणि ते दुचाकीवरून आले होते. संधू यांच्या पत्नीने त्यांच्या पतीची हत्या आतंकवाद्यांनीच केल्याचा आरोप केला आहे.  गेल्या वर्षी संधू यांना देण्यात आलेले पोलीस संरक्षण काढून घेण्यात आले होते.

खलिस्तानी आतंकवाद्यांनी १६ वेळा संधू यांच्यावर १० ते २०० च्या समुहाद्वारे आक्रमण करण्याचा प्रयत्न केला होता. प्रत्येक वेळेला संधू यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी ते परतवून लावले होते. ३० सप्टेंबर १९९० या दिवशी २०० आतंकवाद्यांनी विविध शस्त्रे आणि ‘रॉकेट लाँचर’ने त्यांच्या घरावर आक्रमणे केले होते.