‘डीडी नॅशनल’वर ‘रामलीला’चे अयोध्येतून थेट प्रक्षेपण

हिंदूंच्या धार्मिक कार्यक्रमाचे प्रक्षेपण प्रारंभ करणार्‍या दूरदर्शनचे अभिनंदन !

नवी देहली – डीडी नॅशनल वाहिनीवर १७ ऑक्टोबर ते २५ ऑक्टोबर या कालावधीत अयोध्येतील ‘रामलीला’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण चालू करण्यात आले आहे. संध्याकाळी ७ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत याचे थेट प्रसारण होत आहे.

त्यानंतर दुसर्‍या दिवशी सकाळी ९ वाजता डीडी भारतीवरून, तर दुपारी ३ वाजता डीडी नॅशनलवरून या कार्यक्रमाचे पुनःप्रक्षेपण केले जाणार आहे. अभिनेते रवि किशन, मनोज तिवारी, असरानी, विंदू दारासिंह, रझा मुराद आदी कलाकार यांत भूमिका साकारत आहेत.