उत्पादनांवर त्याच्या निर्मितीविषयी माहिती प्रसिद्ध न केल्यावरून केंद्र सरकारकडून फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन आदींना नोटीस

नवी देहली – भारत सरकारने फ्लिपकार्ट, अ‍ॅमेझॉन यांसारख्या ऑनलाईन साहित्य विक्री करणार्‍या आस्थापांना नोटीस बजावली आहे.

या आस्थापनांकडून विकण्यात येणारी उत्पादने कोणत्या देशात बनवण्यात आली आहेत ?, आस्थापन कोणत्या देशातील आहे ? आदी माहिती न दिल्यावरून त्यांना सरकारने ही नोटीस बजावली आहे. कायद्यानुसार अशी माहिती देणे बंधनकारक आहे. १५ दिवसांत यावर उत्तर देण्यास सांगण्यात आले आहे.