नेपाळ सरकार चीन सीमेवर १५ ठिकाणी सैनिकी चौक्या उभारणार

चीनच्या घुसखोरीनंतर जागे झालेले नेपाळ सरकार

नेपाळ सरकारला सर्व काही गमावण्यापूर्वीच जाग आली, ही एक चांगली घटना आहे !

काठमांडू (नेपाळ) – नेपाळच्या हुमला जिल्ह्यात चीनने २ किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून इमारत बांधल्यानंतर आता नेपाळ जागा झाला आहे. त्याने आता भारतीय सीमेवरील प्रस्तावित ‘बॉर्डर आउटपोस्ट’ (बीओपी) बांधण्याचे स्थगित करून चीनच्या सीमेवर १५ ठिकाणी ‘बीओपी’ बांधण्याची सिद्धता चालू केली आहे.

१. नेपाळकडून प्रथम उत्तराखंड आणि चीन यांच्या सीमेवरील दार्चुला जिल्ह्यापासून बीपीओ बांधण्यात येणार आहेत. त्यानंतर पश्‍चिम नेपाळमधील बझांग जिल्ह्यावरील सीमेवर यांचे बांधकाम केले जाणार आहे.

२. १० ऑक्टोबर या दिवशी नेपाळचे प्रशासन सीमांकन करण्यासाठी हुमला येथील सीमेवर गेले असता चिनी सैन्याने प्रशासनाच्या पथकावर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून त्यांना पळवून लावले. यात नेपाळ सशस्त्र दलाचे ६ सैनिक घायाळही झाले.

३. चीनने हुमाला जिल्ह्यास गोरखा जिल्ह्यातील रूई गावासह १३ ठिकाणी घुसखोरी करून तेथे नियंत्रण मिळवले आहे.