गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे पोलीस चौकीत लाच घेणारा पोलीस निलंबित

अशा पोलिसांना केवळ निलंबित न करता त्यांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांना कारागृहात डांबून कठोरातील कठोर शिक्षा होण्यासाठी सरकारने प्रयत्न करावेत !

गाझियाबाद (उत्तरप्रदेश) – येथील साहिबाबादमधील खोडा पोलीस ठाण्याच्या नेहरू गार्डन चौकीचे प्रमुख गजेंद्र सिंह यांना एका अधिवक्त्याकडून लाच घेतांनाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर सिंह यांना निलंबित करण्यात आले आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचा आदेश वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी दिला आहे. एका प्रकरणात गुन्हा नोंदवण्यासाठी सिंह यांनी लाच मागितली होती. आतापर्यंत अधिवक्ता उमाशंकर शर्मा यांनी सिंह यांना ४० सहस्र रुपये दिले होते; मात्र तरीही सिंह यांनी गुन्हा नोंदवला नव्हता.